खुनाचे प्रयत्न, दंगल भडकवण्याचे अतिगंभीर गुन्हे दाखल होताच शेतकरी आंदोलक नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : खुनाचे प्रयत्न, दंगल पेटवणारी वक्तव्ये करणे यांच्या कलमांचे गुन्हे दाखल होताच शेतकरी आंदोलक नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते मैदानात उतरले आहेत. राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह २६ नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या एकूण १३ कलमांचे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पण हे गुन्हे दाखल होताच, या शेतकरी नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग पुढे आलेले दिसत आहेत. Attempted murder rioting Congress leaders rushed to the rescue of agitating farmers

शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेतच होते. पण काही असामाजिक आणि गुंड प्रवृत्ती शेतकरी आंदोलनात घुसून त्यांनी हिंसाचार माजवल्याचे वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी करून टिकैत, यादव, मेधा पाटकर आदींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण या नेत्यांवर कलम ३०७ खुनाचा प्रयत्न, कलम १४७ दंगल घडविण्याचा गुन्हा, कलम ३५३ पोलिसांवर ते ड्युटीवर असताना हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करणे या गंभीर कलमांचे म्हणजेच दीर्घ मुदतीच्या शिक्षांचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. यातले काही गुन्हे अजामीपात्र आहेत, असे पाहूनच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग टिकैत, यादव, पाटकर आदींच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत.शेतकरी आंदोलन आणि हिंसाचार यात भेद असल्याचा त्यांचा दावा आहे. अर्थात काल सायंकाळी ५.०० नंतर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकऱ्यांनी म्हणजेच राकेश टिकैत, योगेंद्र यादव आणि हनन मुल्ला यांनी तोच दावा करून हिंसाचाराच्या आरोपापासून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. पण राकेश टिकैत यांच्यासह सर्वांचे हिंसाचारास प्रोत्साहन देणारे विडिओ व्हायरल झाले होते, त्या आधारेच पोलिसांनी त्यांवर वर उल्लेख केलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या कलमांर्गत एफआयआर नोंदविले आहेत.

यांच्यावर दाखल झाले गुन्हे

आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण 13 कलमांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.

Attempted murder rioting Congress leaders rushed to the rescue of agitating farmers

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था