तामीळींवरून श्रीलंकेला मानवाधिकारांचा धडा देण्याचा प्रयत्न, संयुक्त राष्ट्रातील मतदानाला अनुपस्थित राहून भारताने केला विरोध

तामीळींबाबत सलोखा ठेऊन त्यांच्या आशा-आकांक्षांनाही फुलू द्या असा सल्ला देत श्रीलंकेविरुध्द मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा प्रस्तावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारी परिषदेत मतदान झाले. मात्र, याला विरोध करत भारताने या प्रश्नापासून अलिप्त राहणेच पसंद केले.  Attempt to teach Sri Lanka a human rights lesson from Tamils, India abstention from UN vote


विशेष प्रतिनिधी

जिनीव्हा : तामीळींबाबत सलोखा ठेऊन त्यांच्या आशा-आकांक्षांनाही फुलू द्या असा सल्ला देत श्रीलंकेविरुध्द मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा प्रस्तावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारी परिषदेत मतदान झाले. मात्र, याला विरोध करत भारताने या प्रश्नापासून अलिप्त राहणेच पसंद केले.

भारताने विरोध केला तरी मानवाधिकार परिषदेतील ४७ पैकी २२ सदस्यांनी समर्थन केल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. श्रीलंका सरकार आणि तामीळबहुल भागातील युध्दग्रस्त तामीळींची प्रतिनिधी संस्था असलेल्या तामीळ नॅशनल अलायान्स या दोघांनीही भारताकडून या प्रश्नी समर्थन मागितले होते.



याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना भारताने म्हटले आहे की, श्रीलंकेतील मानवाधिकारांच्या प्रश्नात भारताचे दोन मुलभूत विचार आहे. तामीळींना समान अधिकार मिळावेत, त्यांचा सन्मान राखला जावा आणि न्याय मिळावा ही भारताची भूमिका आहे. त्याबरोबर श्रीलंकेचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडताही भारतासाठी महत्वाची आहे. हे दोन्ही विचार एकमेंकांत गुंतलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायाने श्रीलंकेला आवाहन केले आहे की राजकीय अधिकारांबाबत तामीळींना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती श्रीलंकेने करावी. पोव्हन्शिअल कौन्सीलच्या निवडणुका घ्याव्यात. त्याचबरोबर त्यांना सक्रीयपणे काम करून द्यावे. भारताचा या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे. भारताने श्रीलंका सरकारला आवाहन केले आहे की तामीळी नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी सलोख्याचे सुरू झालेले पर्यंत सुरू राहिले पाहिजे. श्रीलंका सरकारने यासाठी तामीळ नागरिकांना तयार केले पाहिजे.

Attempt to teach Sri Lanka a human rights lesson from Tamils, India abstention from UN vote

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*