ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्या मोटारीवर युवकाचा हल्ला, सुदैवाने बचावले

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान मक्कल निधी मय्यम (एमएनएम) चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्या मोटारीवर एका युवकाने सोमवारी हल्ला केला. attack on veteran actor Kamal Hassan’s car, fortunately survived

सुदैवाने हसन सुखरूप आहे, मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती पक्षाचे नेते ए. जी. मौर्य यांनी ट्विटरवरुन दिली.<br />युवकाने हसन यांची गाडी अडविण्याचा व गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.‘एमएनएम’च्या काही कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी संबंधित युवकाला मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अटकेनंतर युवकाला रुग्णालयात दाखल केले आहे.

हल्ला करणारा युवक हा कमल हसन यांचा चाहता असून मद्यधुंद अवस्थेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यालत आले.<br />कमल हसन यांची ही पहिलीच निवडणूक असून कोइमतूर (दक्षिण) मतदारसंघातून त्यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.

येथे त्यांना भाजप व काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. ‘एमएनएम’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. हा मतदारसंघ अण्णाद्रमुकचा होता, मात्र यंदा त्यांनी मित्रपक्ष भाजपला तो दिला आहे. येथून भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांना उमेदवारी मिळालेली असून मयुरा एस. जयकुमार या काँग्रेसकडून लढणार आहेत.</p>

attack on veteran actor Kamal Hassan’s car, fortunately survived

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*