इटलीच्या राजदूतांच्या ताफ्यावर कांगोमध्ये बंडखोरांचा हल्ला, राजदुतांचा मृत्यू

वृत्तसंस्था

कांगो : कांगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ताफ्यावर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात इटलीचे राजदूत ल्युका ॲतानाशिओ आणि इतर दोघा जणांचा मृत्यू झाला. Attack on UN convoy in Congo

हे सर्व जण कांगोच्या पूर्व विभागाची राजधानी असलेल्या गोमा येथे जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत राबविल्या जात असलेल्या एका प्रकल्पाला भेट देण्यासाठी जात असताना बंडखोरांनी ताफ्यावर गोळीबार केला.या गोळीबारात ल्युका यांच्यासह गाडीतील एक पोलिस अधिकारी आणि वाहनचालक मारला गेला. या हल्ल्याबद्दल इटलीने तीव्र संताप व्यक्त केला असून हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असा इशारा दिला आहे.

Attack on UN convoy in Congo

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*