मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचे धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचू लागल्यावर एटीएस अ‍ॅक्टीव्ह, म्हणे एनआयएकडे तपास गेलाच नाही

विधानसभेत मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांनी आणि राज्यातील इतर मंत्र्यांनीही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या प्रकरणाचे धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचू लागल्याने एटीएस अ‍ॅक्टीव्ह झाले असून सचिन वाझे हाच हिरेन हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. ATS active says no investigation into Mansukh Hiren murder case by NIA


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांनी आणि राज्यातील इतर मंत्र्यांनीही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या प्रकरणाचे धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचू लागल्याने एटीएस अ‍ॅक्टीव्ह झाले असून सचिन वाझे हाच हिरेन हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा प्रताप केल्यावर सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली होती. त्याअगोदर विधानसभेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी वाझेची बाजू घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे गेल्यावर ऐटीएस अ‍ॅक्टीव्ह झालीआहे.मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असून, त्याच्याच इशाऱ्यावरून हे हत्याकांड घडल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी आता देऊ लागले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही आता एसआयटी म्हणू लागली आहे.

गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. रविवारी या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे.

शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वसोर्वा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पॅरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.

ATS active says no investigation into Mansukh Hiren murder case by NIA

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*