आत्मनिर्भर भारताचे उपाय परिणामकारक; शेअरबाजारात परकीय गुंतवणूकीचा तुफान ओघ; डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ६८,५५८ कोटींची परकीय गुंतवणूक

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमधून परकीय गुंतवणूक वाढल्याचे चित्र दिसते आहे.
परकीय गुंतवणुकीच्या तुफान ओघाने सेन्सेक्स आणि निफ्टीने सार्वकालीन उच्चांक गाठल्याने डिसेंबर महिना दोन्ही शेअर निर्देशांकांसाठी सर्वात यशस्वी ठरला आहे.

डिसेंबर २०२० मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात तब्बल ६८ हजार ५५८ कोटींची गुंतवणूक केली आहे. कोरोना संकटात भारतासारख्या मोठ्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची ही मोठी गुंतवणूक आहे. atmanirbhar bhart announcement proved postive, FDI in indian market increased drastically

मागील काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक तुलनेने कमी नुकसान झाले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला होता. त्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारातून पैसे काढून घेतले होते. आता मात्र ओघ पुन्हा भारतीय शेअर बाजाराकडे वळल्याचे दिसत आहे.केंद्र सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी दुसया तिमाहीत आत्मनिर्भर भारत या महत्वकांक्षी योजनेत २० लाख कोटी रूपयांची घोषणा केली. त्याचा परकीय गुंतवणूकदारांवर अनुकूल परिणाम झालेला दिसतोय. त्यांनी पुन्हा भारतीय बाजारांमध्ये गुंतवणुकीचा धडाका लावला आहे.

atmanirbhar bhart announcement proved postive, FDI in indian market increased drastically

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या माहितीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आतापर्यंतची इक्विटीमधील सर्वाधिक गुंतवणूक आहे.

  • डिसेंबरमध्ये झालेल्या ६८५५८ कोटींमधील ६२०१६ कोटी शेअरमध्ये गुंतवणूक.
  • ६५४२ कोटी डेट श्रेणीत गुंतवणूक
  • ऑक्टोबरमध्ये २२०३३ कोटींची गुंतवणू
  • नोव्हेंबरमध्ये ६२९५१ कोटींची गुंतवणूक

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*