अटल टनेलने चीनचा विक्रम मोडला

  • रोहतांगमधील अटल टनेल; १० हजार फूट उंचीवर बनलेल्या जगातील सर्वांत लांब बोगदा
  • हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बोगदा

वृत्तसंस्था 

रोहतांग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी रोहतांगमध्ये अटल टनलचे उद्घाटन केले. जवळपास १० हजार फूट उंचीवर बनलेला हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी ९.२ किलोमीटर आहे. तो बनवण्यास १० वर्षांचा काळ लागला.

हिमालयातील पीर पंजाल डोंगररांगेत रोहतांग खिंडीलगत लेह-मनाली महामार्गावर बांधला आहे. यामुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरने कमी होईल आणि चार तासांची बचत होईल. याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे.

यातून काय फायदा होईल?

बोगद्यामुळे मनाली आणि लेह – स्पीती व्हॅली १२ महिने जोडलेले राहील. मुसळधार हिमवृष्टीमुळे या खोऱ्याचा सहा महिने संपर्क तुटतो. बोगद्याचे दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. तर उत्तर पोर्टल लाहुल खोऱ्यामध्ये सीसूच्या तेलिंग गावाजवळ आहे.

बोगद्यातून जात असताना, सपाट रस्त्यावरून जात असल्यासारखे वाटेल, परंतु बोगद्याच्या एका भागात आणि दुसर्‍या भागात ६० मीटर उंचीचा फरक आहे. दक्षिण पोर्टल समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर आहे, तर उत्तर पोर्टल 3060 मीटर उंच आहे.

१०.५ मीटर रुंद, १० मीटर उंच बोगद्याकरत

२९५८ कोटी रुपये खर्च आला. १४५०८ मेट्रिक टन स्टील लागले. २,3७,५९६ मेस्ट्रीक टन सीमेंटचा वापर झाला. १४ लाख घन मीटर डोंगर खोदले.

  • प्रत्येक १५० मीटर अंतरावर 4 जी ची सुविधा. तसेच प्रत्येक १५० मीटरच्या अंतरावर एक टेलीफोन
  • प्रत्येक ६० मीटरच्या अंतरावर फायर सिस्टम. प्रत्येक २५० मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे. प्रत्येक ५०० मीटरवर इमरजेंसी एग्जिट. प्रत्येक २.२ किलोमीटरवर गुहा मोड
  • ८० किलोमीटर/तास राहणार वाहनांची स्पीड
  • दररोज ४५०० वाहने या बोगद्यातून प्रवास करतील असा अंदाज

प्रथम हा विक्रम चीनच्या नावावर होता.

अटल बोगद्यापूर्वी हा विक्रम चीनच्या तिबेटमधील बोगद्याच्या नावावर होता. ल्हासा आणि न्यिंग्ची दरम्यान ४०० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर तो बांधल आहे. त्याची लांबी ५.७ किलोमीटर आहे. तो मिला माउंटनवर बांधले गेले आहे. त्याची उंची ४७७५० मीटर आहे. तो तयार करण्यासाठी ” 3८५०० कोटी रुपये खर्च झाले. हे २०१९ मध्ये सुरू झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*