असुद्दीन ओवेसींना पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका, प्रदेशाध्यक्षांनीच पक्ष सोडला

पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन निवडणुकांत उतरलेल्या एआयएमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना निवडणुकीच्या तोंडावरच झटका बसला आहे. त्यांच्या पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष जमीरूल हसन यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन इंडीयन नॅशनल लिगमध्ये प्रवेश केला आहे. Asuddin Owaisi in West Bengal, the state president himself left the party


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन निवडणुकांत उतरलेल्या एआयएमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना निवडणुकीच्या तोंडावरच झटका बसला आहे.

त्यांच्या पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष जमीरूल हसन यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन इंडीयन नॅशनल लिगमध्ये प्रवेश केला आहे.पश्चिम बंगालमध्ये ओवेसी यांनी जोरदार तयारी केली होती.राज्यात ३० टक्यांवर असलेल्या मुस्लिम मतांवर त्यांची भिस्त आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षांनीच पक्षत्याग केल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरणार असल्याचे बोलले जात आहे. हसन हे मुस्लिम लिगमध्ये जाणार आहेत. इंडीयन नॅशनल लिगने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला आहे.

ओवेसी यांच्याकडून दूर्लक्ष केले जात असल्याने हसन नाराज होते. ते म्हणाले, मी २०१५ मध्ये एआयएमआयएम पश्चिम बंगालमधील २० जिल्ह्यांत पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. ममता बॅनर्जी यांच्याशी संघर्ष केला.

अनेक कार्यकर्त्यांना अटका झाल्या. मात्र, तरीही ओवेसी यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमची बाजू मांडली नाही. तृणमूल कॉँग्रेसने देऊ केलेली राज्यसभेची जागाही सोडली. त्याजागी आंदोलने करून अटक करून घेणे पसंत केले.

Asuddin Owaisi in West Bengal, the state president himself left the party

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*