आसाममधल्या १२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाने रोखल्या; भाजप सरकारला दणका

वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसाममध्ये मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या भाजपच्या सरकारने १२ आयपीएस आणि ६ एपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्या निवडणूक आयोगाने आज रोखल्या. हा सरकारला दणका मानला जात आहे. Assam has on Feb 26 ordered transfer of 12 IPS and 6 APS officers Elecetion Commission

सरकारने काल २६ फेब्रुवारी रोजी १२ आयपीएस आणि ६ एपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढली होती. परंतु, काल सायंकाळीच निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन आसामसह पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूकांची घोषणा केली होती.निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच निवडणूक आचारसंहिता लागू होत असते. त्यामुळे त्या आचारसंहितेच्या विरोधात जाऊन कोणतेही सरकार, राजकीय पक्ष किंवा व्यक्ती कार्यवाही करू शकत नाही.

आसाममधल्या १२ आयपीएस आणि ६ एपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डरवर नेमकी कालची म्हणजे २६ फेब्रुवारी ही तारीख आहे. यानंतर ते अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी जाऊन चार्ज घेणार होते.

परंतु, निवडणूक आयोगाने या बदलीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि निवडणूक आचारसंहितेचा हवाला देत या अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखल्या आहेत. निवडणूकीचे निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू राहते. तोपर्यंत या अधिकाऱ्यांच्या बदल्या स्थगित राहतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Assam has on Feb 26 ordered transfer of 12 IPS and 6 APS officers Elecetion Commission

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*