जे नेते मोदींना चायवाला म्हणून खिजवत होते… तेच आज आसाममध्ये येऊन चहापत्ती खुडत आहेत; राजनाथ सिंगांची प्रियांका गांधींवर बोचरी टीका

वृत्तसंस्था

लुमडिंग (आसाम) – जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना चायवाला म्हणून खिजवत होते, तेच आज आसाममध्ये येऊन चायपत्ती खुडत आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. assam assembly election 2021; rajnath singh targets priyanka gandhi over tea garden showbiz!!

आसाम विधानसभेच्या निवडणूकीसाठी नुकतीच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची दिब्रुगढमध्ये प्रचारसभा झाली असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसामच्या लुमडिंगमध्ये जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली.राजनाथ सिंग म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘चायवाला’ अशी संभावना करून काँग्रेस नेत्यांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली आहे. आधी ते मोदीजींची ‘चायवाला’ म्हणून खिल्ली उडवत होते, तेच लोक आज आसाममध्ये येऊन

चहापत्ती खुडत आहेत आणि विकत आहेत. पण आमच्या खऱ्या चायवालाने त्यांना चहाच्या मळ्यांपर्यंत आणून सोडले आहे. पण खबरदार, खरा आणि प्रमाणित चायवाला आमच्यासोबत आहे”, असा टोलाही राजनाथ सिंग यांनी प्रियांका गांधी  यांना लगावला.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आसाममध्ये चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन तिथल्या महिला मजुरांसोबत चहापत्ती खुडली होती. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरूनच राजनाथ सिंग यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे. आणि त्यांनी केलेल्या टीकेला राजकीय महत्त्व आहे.

assam assembly election 2021; rajnath singh targets priyanka gandhi over tea garden showbiz!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*