शरजिलला पळून जाण्यात कोणाची मदत ? शेलार यांचा ठाकरे – पवार सरकारला सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरजिल उस्मानीवर गुन्हा दाखल करायला राज्यातील ठाकरे सरकारने दिरंगाई का गेली? ज्या पद्धतीने या एल्गार परिषदेत काही ना काही गडबड, धार्मिक भावना दुखावल्या जातात याची पार्श्‍वभूमी असतानाही परवानगी का दिली?Ashish Shelar targeted Thackeray Govt over Sharjil Usmani

त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शरजिलला पळून जाण्यास सरकारमध्ये कुणी मदत केली हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.हिंदुत्वाचा खरा क्‍लास कुठे असतो, त्या नागपूरच्या कार्यालयात वारंवार या आधी आपण भेटलो आहोत. आताही जाऊन यावे. शिवसेनेची अवस्था खाली डोकं वर पाय अशी झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून आमदार शेलार यांनी लगावला.

Ashish Shelar targeted Thackeray Govt over Sharjil Usmani

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*