काँग्रेस ग्रेसचा आरेच्या भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा होता डाव, आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट


काँग्रेसचा आरेच्या भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा डाव 2014 सालीच होता. पण तो डाव नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने हाणून पाडला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ashish shelar news


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : काँग्रेसचा आरेच्या भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा डाव 2014 सालीच होता. पण तो डाव नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने हाणून पाडला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ashish shelar news

आरेच्या कारशेडचा भूखंड नाममात्रदराने एमएमआरडीएला व्यवसायिक वापरासाठी द्यावा, असा निर्णय 3 मार्च 2014 रोजी तत्कालीम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. हा निर्णय नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने हाणून पाडला, असे शेलार यांनी सांगितले. आरेच्या भूखंडाचा वापर कोणत्याही व्यवसायिक कामासाठी न करता मेट्रो कारशेडसाठी करावा, असा निर्णय भाजप सरकारने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन व्यवसायिक वापराच्या निर्णयाला प्रतिबंध केला. हे देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे.

शेलार म्हणाले, खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना आज वचन देण्याची वेळ आली आहे. कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चर्चेला बोलावलं तर ते यायला तयार नाहीत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण व्यवसायिक वापराची गोष्ट करत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आरेच्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या कमर्शिअल गोष्टी केल्या जाणार नाहीत, असं वचन द्यावे.

आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती, असा आरोप करुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अज्ञानाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करीत, अतिशहाणपणाचा भाग-2 सादर केला आहेह्व, असा टोला लगावत शेलार म्हणाले, सावंत यांनी आता हे सारे बोलून महाराष्ट्राचे विद्यामान मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना पण संशयाच्या भोवºयात आणले आहे.

supriya sule news

कारशेड स्थलांतरीत करुन आरेतील जागेचा वापर अन्य गोष्टींसाठी करणार असे सागणारे विद्यमान मुख्यमंत्री, या जागेचा वापर नेमका कशासाठी करणार? की सत्तेतील पार्टनर असलेल्या काँग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री मदत करणार?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती