औवेसी पुन्हा बरळले- ‘अयोध्‍या मशिदीसाठी दान देणे, तेथे नमाज अदा करणे हराम’, मशिदीच्या ट्रस्टने केली बोलती बंद!

asaduddin owaisi Claims Donating for Ayodhya mosque, praying there is haraam, mosque trust hits Back

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्‍येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करण्याला ‘हराम’ म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या बीदरमध्ये मंगळवारी ओवैसींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ओवैसींच्या या वक्तव्याचा समाचार घेत मशिदीच्या ट्रस्टनेही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. अयोध्‍या मशीद ट्रस्‍टचे सचिव आणि इंडो इस्‍लामिक कल्‍चरल फाउंडेशनचे अतहर हुसैन यांनी याला राजकीय लाभासाठी ओवैसींनी केलेले वक्तव्य म्हटले आहे. asaduddin owaisi Claims Donating for Ayodhya mosque, praying there is haraam, mosque trust hits Back


विशेष प्रतिनिधी

अयोध्‍या : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्‍येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करण्याला ‘हराम’ म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या बीदरमध्ये मंगळवारी ओवैसींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ओवैसींच्या या वक्तव्याचा समाचार घेत मशिदीच्या ट्रस्टनेही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. अयोध्‍या मशीद ट्रस्‍टचे सचिव आणि इंडो इस्‍लामिक कल्‍चरल फाउंडेशनचे अतहर हुसैन यांनी याला राजकीय लाभासाठी ओवैसींनी केलेले वक्तव्य म्हटले आहे.

हे काय बोलले ओवैसी….

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, ‘बाबरी मशिदीच्या ऐवजी 5 एकर जागा घेऊन मशीद बांधली जातेय. मशिदीचे नाव एक मुजाहिदे-आझादी अहमदुल्लाच्या नावे ठेवले जात आहे. ऐ जालिमों… चुल्लू भर पानी में डूबकर मर जाओ.’
ओवैसी म्हणाले की, ‘मी उलेमांना विचारले, मुफ्ती आणि जबाबदार व्यक्तींना विचारले, प्रत्येकाने त्या मशिदीत नमाज अदा न करण्याचे सांगितले. बाबरी मशिदीच्या जागेवर पाच एकर जमीन घेऊन मशीद बांधली जातेय, त्यात नमाज अदाज करणे हराम आहे.’ओवैसींवर मुस्लिम संघटनांची नाराजी

एवढेच नाही, असदुद्दीन ओवैसी पुढे असेही म्हणाले होते की, ‘बाबरी मशिदीच्या बदल्यात ज्या 5 एकर जमिनीवर मशीद बांधताहेत, ती वास्तवात मशीद नसून ‘मस्जिद-ए-जीरार’ आहे. अशा मशिदीत नमाज अदा करणे हराम आहे. याला देणगी देणेही हराम आहे.’ आता ओवैसींच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर मुस्लिम संघटना आणि धर्मगुरूंनी आक्षेप घेतला आहे. ओवैसींच्या वक्तव्यावर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त करून त्यांना हैदराबादेतच राहण्याचा सल्ला दिला आहे. विविध धर्मगुरूंनी आक्षेप नोंदवत ओवैंसीच्या वक्तव्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह असल्याचे म्हटले आहे.

ट्रस्‍टकडून 1857च्या उठावाची आठवण

‘टाइम्‍स ऑफ इंडिया’शी बोलताना ट्रस्टच्या अतहर हुसैन यांनी म्हटले की, ‘या पृथ्वीवर जेथे कुठे अल्‍लाहसाठी नमाज पढली जाते, ती जागा ‘हराम’ असू शकत नाही.’ ते पुढे म्हणाले की, ‘ज्या भागातले ओवैसी आहेत तेथे 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्याचा इतिहास नाही. ओवैसींच्या पूर्वजांनी 1857मध्ये ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या बंडात भागच घेतलेला नसल्याचीही शक्यता आहे.’

asaduddin owaisi Claims Donating for Ayodhya mosque, praying there is haraam, mosque trust hits Back

अयोध्येला या उठावाचे केंद्र सांगत अतहर हुसैन म्हणाले की, अयोध्‍येत बांधले जाणारे इंडो-इस्‍लामिक कल्‍चरल फाउंडेशनचे हे केंद्र अहमदुल्‍लाह शाह यांना समर्पित आहे. ज्यांनी फैजाबादला ब्रिटिश राज्यकर्त्यांपासून जवळजवळ वर्षभर स्वतंत्र ठेवले होते. हुसैन यांनी ओवैसींनाच प्रश्न केला की, ‘अहमदुल्‍लाह शाह यांच्या बलिदानाचा सन्मान करत या केंद्राचे नाव आम्ही अहमदुल्‍लाह शाह यांच्यावर ठेवले आहे, मग काय तेसुद्धा हराम आहे.’

asaduddin owaisi Claims Donating for Ayodhya mosque, praying there is haraam, mosque trust hits Back

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था