As interest rates remain, the RBI believes the economy will run in double digits

व्याजदर जैसे थे, अर्थव्यवस्था डबल डिजिटमध्ये धावणार असल्याचा रिझर्व्ह बँकेचा विश्वास

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी पतधोरणाचा आढावा जाहीर केला आहे. आरबीआयने यावेळीही व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आशेवर असलेला मध्यमवर्ग यामुळे निराश झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. As interest rates remain, the RBI believes the economy will run in double digits


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी पतधोरणाचा आढावा जाहीर केला आहे. आरबीआयने यावेळीही व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आशेवर असलेला मध्यमवर्ग यामुळे निराश झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही, याचा अर्थ रेपो दर अजूनही 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर राहील.

वित्तीय तूट कमी करण्याकडे आरबीआयचे लक्ष आहे. म्हणूनच तज्ज्ञ आधीच अंदाज लावत होते की, व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच व्याजदर यापूर्वीही बर्‍यापैकी कमी करण्यात आले आहेत, म्हणून यावेळीसुद्धा अपेक्षा कमी होती. उल्लेखनीय आहे की, 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा घेतला आहे.अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा

रिझर्व्ह बँकेने पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपीमध्ये 10.5 टक्के वाढीचा अंदाज लावला आहे. तत्पूर्वी, आर्थिक सर्वेक्षणात तो 11 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, हळूहळू घरांची विक्री सुधारली असून लोकांची खर्चाची क्षमताही पुन्हा एकदा सुधारली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे, गुंतवणुकीची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. शक्तिकांत दास यांना पत्रकार परिषदेत सांगितले की, जानेवारी ते मार्चदरम्यान महागाईचा दर 5.2 टक्के राहू शकतो.

As interest rates remain, the RBI believes the economy will run in double digits

आता रेपो दर चार टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर आहे. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून बँकेने रेपो दरात 1.15 टक्क्यांची कपात केलेली आहे.

As interest rates remain, the RBI believes the economy will run in double digits

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*