भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलचे नकारात्मक अंदाज चुकताहेत; स्थितीत वेगवान सुधारणा : के. व्ही. कामत


मोदी सरकारच्या सकारात्मक धोरणातून ग्रामीण क्षेत्र, कृषीमध्ये रोजगार वाढतोय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनानंतरचे अर्थसंकट वाटते तेवढे गंभीर उरलेले नाही. विविध वित्तीय सर्वेक्षण संस्थांच्या अंदाजापेक्षा भारतीय अर्थव्यवस्था अधिक चांगल्या प्रमाणात सुधारते आहे. सरकारने सकारात्मक धोरणे स्वीकारल्याने पावले भारतात रोजगाराची परिस्थिती सुधारत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होणारी सुधारणा ‘यू शेप रिकव्हरी’ असेल आणि त्यामध्ये वेगाने वाढ होत राहील, असा विश्वास प्रसिद्ध बँकर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ के.व्ही. कामत यांनी व्यक्त केला आहे.

न्यू डेव्हलपमेट बँकेचे (एनडीबी) माजी प्रमुख के. व्ही. कामत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्थव्यवस्थेची सुधारणा, कोरोनाचे संकट आणि चीनबरोबरच्या संघर्षातील रणनीती यासारख्या अनेक विषयांवर चर्चा केली. दक्षिणेकडील देश एकजूट होऊन प्रगती करू शकतात, असे कामत यांनी सांगितले.

मुडीसारख्या विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय सर्वेक्षण संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे नकारात्मक चित्र रंगविले होते. या पार्श्वभूमीवर कामत यांच्या सारख्या यशस्वी बँकरने त्याच विषयी आशादायक मांडणी करण्याला विशेष महत्त्व आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत ४.५ टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब-याच रेटिंग एजन्सींनीही अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यावर कामत म्हणाले, “यू-शेप रिकव्हरीमुळे अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्याची शक्यता आहे. ज्याप्रकारे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेबाबत भीती व्यक्त केली जात आहे, सुधारणा होताना तेवढ्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही. अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित होण्यासाठी काही संकट देखील येतील, पण भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने त्यावर मात करणे शक्य आहे.”

मोदी सरकारच्या गेल्या ६ वर्षांच्या कामगिरीबाबत कामत म्हणाले, “आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मिळणारे झटके भारताला देखील सहन करावे लागत आहेत. अशावेळी सरकार ज्या वेगाने काम करत आहे, त्यामुळे असा विश्वास वाटतो की ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न सत्यात उतरू शकते.”

कोरोनानंतर अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा कसा असेल, यावर कामत म्हणाले, “भारताच्या विकासदराबाबत विविध संस्थांच्या मताशी मी सहमत नाही. मात्र कोरोनाच्या परिस्थितीचे आकलन करणे कठीण आहे. भारताची आर्थिक सुधारणा व्यक्त केलेल्या नकारात्मक अंदाजांपेक्षा नक्कीच चांगली असेल. कारण सरकार सतत मोठी पावले उचलत आहे. कृषी क्षेत्रातही अधिक रोजगार मिळत आहे, या क्षेत्रातही वेगाने सुधारणा होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा तसा कमी परिणाम पाहायाला मिळत आहे. त्याचप्रमाणे सरकार डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत देखील गंभीर आहे. याचा फायदा नक्कीच होत आहे.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था