अर्णबच्या अटकेवर ल्यूटियन्स मीडिया, बॉलिवूड, खान मार्केट गँग गप्प


  • सहिष्णुता, मतस्वातंत्र्यांचे कैवारी ठाकरे – पवार सरकारच्या अघोषित आणीबाणीवर गप्प

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवारांचे सरकार इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल टाकत अघोषित आणीबाणी लादत असताना ल्यूटियन्स मीडिया आणि दिल्लीची कुविख्यात खान मार्केट गँग आणि बॉलिवूडमधले तथाकतिल लिबरल्स गप्प आहेत. arnab goswami latest news

 

रजत शर्मा, नाविका कुमार, सुशांत सिन्हा, चित्रा सुब्रह्मण्यम, विर संघवी आदी पत्रकारांनी अर्णबच्याअटके विरोधात आवाज उठवणारे ट्विट केले असताना नेहमीचा यशस्वी लिबरल मीडिया मात्र या अटकेवर मूग गिळून गप्प बसला आहे. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार हे लिबरल गँगचे म्होरके अर्णबच्या अटकेविरोधात ब्र काढायला तयार नाहीत. बरखा आणि राजदीप हे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील निकालाच्या चुरशीचे ट्विट करण्यात मग्न आहेत.arnab goswami latest news

 

नाही म्हणायला राजदीपने एडिटर्स गिल्डचे अर्णबच्या अटकेच्या विरोधाचे पत्र एका ओळीच्या कॉमेंटसह रिट्विट केले आहे. बरखा दत्तने ते देखील केलेले दिसत नाही. जणू काही भारतात अर्णब नावाच्या पत्रकाराला अटक झाल्याचे तिच्या गावीही नाही. बरखा दत्तची सतत ट्रम्प – बिडेन लढतीतील चुरशीची ट्विट येत आहेत. जे बरखाचे तेच रवीश कुमारचे. अर्णबच्या अटकेविरोधात आत्तापर्यंत काही प्रतिक्रियाही नाही.

 


या सर्वांवर कळस केला आहे, तो अँवॉर्ड वापसी फेम डाव्या लिबरल गँगने. कंगना राणावतच्या मुलाखतीतील एका विधानाने बदनामी झाल्याचा कांगावा करणाऱ्या जावेद अख्तर यांनी अर्णबच्या अटकेविरोधात एक चकार शब्द काढलेला नाही. एरवी देशात कोणी कुठली फुसकुली सोडली तर ट्विटचा टिवटिवाट सुरू करणारे स्वरा भास्कर, विशाल, दीपिका, श्रद्धा ही गँग जणू सोशल मीडियावरून गायब झाली आहे. ना कोणाचे ट्विट, ना कोणाची फेसबुक पोस्ट. हे सगळे सिलेक्टिव्ह विषयांवर व्यक्त होताना दिसतात.arnab goswami latest news

 

 

या सगळ्यांना मोदी सरकार आल्यापासून असहिष्णुतेच्या वातावरणाचा कंठ फुटला होता. अमिर खानसाठी भारत असुरक्षित होता. परंतु, आज अर्णबला पहाटे घरात घुसून अटक करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारविरोधात काही शब्दांचे ट्विट करावेसे वाटले नाही. कारण अर्णब त्यांच्या सोयीचे बोलत नव्हता. किंबहुना त्यांच्या हितसंबंधांचा भांडाफोड करत होता.

arnab goswami latest news

एडिटर्स गिल्डने देखील एरवी मुक्त पत्रकारितेचे धडे देत असते. त्यांनी सुद्धा सकाळी एक पत्र ट्विट करून हातचे राखून अर्णबच्या अटकेला साधा विरोधा केला. कडक शब्दांत निषेध करणे टाळले. अर्णबला चांगली वर्तणूक पोलिसांनी द्यावी एवढी अपेक्षा ठाकरे – पवार सरकारकडून व्यक्त केली. या पेक्षा अधिक काही एडिटर्स गिल्डने केलेले दिसत नाही. उलट एडिटर्स गिल्डच्या काही सदस्यांनी आडवळणाने अर्णब कसा निपक्षपाती पत्रकारिता करत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

 

या सगळ्यात अर्णबने ठाकरे – पवार सरकार विरोधात आवाज उठविलेल्या मूळ मुद्द्यांवर बोलायला कोणी तयार दिसले नाही. उलट काही हिंदुत्ववादी नागरिकांनी अर्णबच्या अटकेनंतर भाजपवरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी पत्रकाराला अटक होताना केंद्रातील हिंदुत्ववादी सरकार नुसता शाब्दिक निषेध करते, अशी ट्विट काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था