अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई, जबर मारहाण, गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक; उच्च न्यायालयात तक्रार


मुंबई पोलीसांनी सुडाच्या भावनेतून रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. अर्णब यांना बुटाने मारण्यात आले, त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. (arnab goswami latest news) 


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबई पोलीसांनी सुडाच्या भावनेतून रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. अर्णब यांना बुटाने मारण्यात आले, त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. arnab goswami latest news

अर्णब गोस्वामी यांच्या वकीलांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस आल्यास आहेत. त्यांच्या डाव्या हातावर मारहाणीमुळे सहा इंज खोल जखम झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. पोलीसांनी आपल्याला बुटाने मारहाण केल्याचे अर्णब यांनी म्हटले आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी अटक केल्यावर अर्णब यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. त्यांना बुट घालण्यासाठीही वेळ देण्यात आला नाही. त्याचबरोबर अलिबागला घेऊन जाताना पाणीही पिण्यास दिले नाही. त्याचबरोबर पोलीसांनी काहीतरी संशयास्पद द्रव पिण्यास भाग पाडले.

arnab goswami latest news

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारल्याने अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुध्दीने कारवाई करण्यात आली. इंटिरिअर डिझाईनर अन्वय नाईक यांचे दोन वर्षांपूर्वीचे आत्महत्या प्रकरण उकरून काढण्यातआले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस व्हॅनमधून अलिबाग येथष नेण्यात आले. व्हॅनमध्ये पोलीसांनी त्यांना बुटाने मारले. या काळात त्यांना पाणीही पिण्यास दिले नाही. पोलीसांकडून त्यांच्याशी अत्यंत वाईट वर्तन करत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती