चिनी विस्तारवादावरून राहुलजींनी केला मोदींवर वार; अरूणाचलच्या खासदाराने खोलले “रहस्य…”; लष्करप्रमुखांनी आखलेल्या ऑपरेशनला कोणी नाकारली परवानगी?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनच्या विस्तारवादी धोरणाला मोदी सरकारकडे प्रत्युत्तर नाही, असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये केला खरा… पण त्यामागचे रहस्य अरूणाचलमधील खासदार तापिर गाओ यांनी उघड केले आहे. Army Chief planned an op but Rajiv Gandhi denied him permission to push back PLA BJP MP from Arunachal Pradesh Tapir Gao

अरूणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत चीनने १० घरे बांधून १०० जणांची वस्ती केल्याची बातमी सॅटेलाइट इमेजच्या हवाल्याने चालली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर खुलासाही केला आहे. त्या विषयावरूनच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारकडे व्हिजन नाही. देशाच्या संरक्षणाचे धोरण नाही. ते फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करतात. पण इव्हेंट मॅनेजमेंटमधून चीनसारख्या विस्तारवादी देशाला रोखता येणार नाही. कारण चीनकडे स्पष्ट धोरण आहे. त्यांना देशाचा भौगौलिक विस्तार करायचा आहे, अशी स्पष्ट वक्तव्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली.


राजीव गांधी फौंडेशनला देणग्या देणारी नररत्नं, भगौड्यांपासून ते देशद्रोहींपर्यंत


पण चीनच्या विस्तारवादाबद्दल अरूणचाल प्रदेशातील खासदार तापिर गाओ यांनी स्थानिक माहितीच्या आधारे काही वेगळीच कहाणी सांगितली आहे. तापिर गाओ यांनी उलट काँग्रेसवरच निशाणा साधला आहे. ते म्हणतात की “राजीव गांधींच्या काळापासून म्हणजेच १९८० च्या दशकापासून चीन भारतीय भूभागावर कब्जा करत आहे. चीन गावे वसवतेय, भारतीय सीमेजवळ सैन्य शिबीर बनवतेय हे काही नवीन नाही. आज आपण काँग्रेस सरकारांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भोगत आहोत.”

तापिर गाओ म्हणाले की, “चीन या भागात १९८० च्या दशकापासून रस्ते बांधायच्या मागे लागला आहे. त्यांनी लोंग्जूपासून माजापर्यंत रस्ता बांधला आहे. राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात चीनने तवांगमध्ये सुमदोरोंग चू घाटीवर कब्जा केला होता. त्यावर तत्कालीन लष्कर प्रमुखांनी एका ऑपरेशनची योजना देखील आखली होती. मात्र, राजीव गांधींनी त्यांना चिनी सैन्याला परत पाठवणाऱ्या त्या योजनेवर काम करण्याची परवानगी नाकारली होती.”

Army Chief planned an op but Rajiv Gandhi denied him permission to push back PLA BJP MP from Arunachal Pradesh Tapir Gao

नंतरच्या काँगेस सरकारांनी देखील सीमेपर्यंत रस्ते तयार केले नाहीत. यामुळे ३ ते ४ किलोमीटरचा बफर झोन राहिला. आणि आता या भूभागावर चीनने कब्जा केला आहे, याची आठवण भाजप खासदाराने करून दिली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी