ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याचना, २० लाख कोरोना लस पाठविण्याची केली विनंती


भारतात तयार झालेल्या कोरोना लसीवर विरोधकांकडून शंका घेतली जात असताना ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी लसीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याचना केली आहे. तातडीने २० लाख कोरोना लस पाठविण्याची विनंती केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात तयार झालेल्या कोरोना लसीवर विरोधकांकडून शंका घेतली जात असताना ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी लसीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याचना केली आहे. तातडीने २० लाख कोरोना लस पाठविण्याची विनंती केली आहे.
Appeal by the President of Brazil to Prime Minister Narendra Modi

कोरोनाचा कहर असलेल्या देशांत ब्राझीलचा जगात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोनाने बाधित होत असून दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना लस उपलब्ध करून देण्यासाठी ब्राझिलीयन जनतेचा तेथील सरकारवर दबाव वाढत चालला आहे.


कोरोना प्रतिबंधक लसीकरण असे राबविणार; कोविड योद्धे, सफाई कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण


त्यामुळे ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्याची प्रत राष्ट्रपतींच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे. यात जेयर बोलसोनारो यांनी एस्ट्राजेनेका लसीचे २० लाख डोस पाठवावेत, अशी मागणी केली आहे. लस उपलब्ध होत नसल्याने ब्राझीलमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.

Appeal by the President of Brazil to Prime Minister Narendra Modi

लस उपलब्ध नसल्याने अन्य देशांच्या तुलनेत ब्राझीलमध्ये लसीकरण कार्यक्रम मागे पडला आहे. त्यामुळेच भारताकडून लस मिळण्याची प्रतिक्षा ब्राझीलचे सरकार करत आहे. भारतामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला हे लसीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. सरकारकडून मोफत लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती