कोरोना लस नोंदणीसाठी ॲप तयार केलेले नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सावधान राहण्याचा इशारा

कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिम देशात सुरु होणार आहे. परंतु केंद्र सरकारने लस नोंदणीसाठी कोणतेही ऍप तयार केलेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. app is not Created for corona vaccine registration; Union Health Ministry warns


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिम देशात सुरु होणार आहे. परंतु केंद्र सरकारने लस नोंदणीसाठी कोणतेही ऍप तयार केलेले नाही, असे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.कोरोना लस घेण्यासाठी सरकारकडे नोंदणी करावी लागणार आहे. सध्या को विन नावाच्या ऍपची चर्चा आहे. परंतु सरकारने तसे कोणतेही ऍप सुचविलेले नाही. ते डाउनलोड करण्याच्या फंदात पडू नका आणि त्यावर नोंदणी करू नका, माहिती देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. नोंदणीसाठी योग्य वेळी कळविले जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

app is not Created for corona vaccine registration; Union Health Ministry warns

देशात लसीकरण पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. प्रथम फ्रंट वर्कर ना लस दिली जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना लस दिली जाणार आहे, असे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*