अनुराग कश्यपबाबत सगळे सांगूनही इरफान पठाण गप्प बसला, पायल घोषचा आरोप

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष हिने क्रिकेटपटू इरफान खानवर नाराजी व्यक्त केली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत काय केले हे सांगूनही इरफान गप्प बसला असा आरोप पायलने केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष हिने क्रिकेटपटू इरफान खानवर नाराजी व्यक्त केली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत काय केले हे सांगूनही इरफान गप्प बसला असा आरोप पायलने केला आहे.

पायलने ट्विट केले आहे की, मी इरफानला एकदम हे नव्हते सांगितले की, मिस्टर कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, पण मी बोलण्याविषयी सर्व काही सांगितले होते. हे माहिती असूनही ते गप्प आहेत आणि एकेकाळी ते माझा चांगला मित्र असल्याचा दावा करायचे.

पायलने इरफान पठानसोबता आपला फोटो शेअर केला. यामध्ये तिने म्हटले आहे की, इरफान पठानला टॅग करण्याचा अर्थ असा नाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी ज्या लोकांना मिस्टर कश्यपविषयी शेअर केले होते, केवळ बलात्काराची गोष्ट वगळता, ते त्यामधील एक आहेत. मला माहिती आहे की, ते आपला ईमान आणि वृध्द आई-वडिलांवर विश्वास ठेवतात. यामुळे आशा करते की, मी त्याच्यासोबत जे शेअर केले त्याविषयी ते बोलतील.’

पायलने अनुराग कश्यपवर आरोप केला आहे की, 2014-15 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला होता. त् विरोध केल्यानंतर अनुरागने तिला म्हटले होते की, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी आणि माही गिलसह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत होत्या.

22 सप्टेंबर रोजी पायल घोषने अनुरागविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये वर्सोवामधील करी रोडवर अनुरागने बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. 8 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात अनुराग कश्यपची सुमारे 8 तास चौकशी केली गेली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*