अनुराग कश्यपची लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्ट करा, पायल घोष यांची पंतप्रधान, गृह मंत्र्यांकडे मागणी

अनुराग कश्यपने पोलीसांना खोटा जबाब दिला आहे. त्याची लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्ट करावी, अशी मागणी अभिनेत्री पायल घोषने केली आहे. याबाबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ट्विट केले आहे. सत्य शोधण्यासाठी माझे वकील कश्यपची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्टसाठी अर्ज करतील, असेही पायलने म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनुराग कश्यपने पोलीसांना खोटा जबाब दिला आहे. त्याची लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्ट करावी, अशी मागणी अभिनेत्री पायल घोषने केली आहे. याबाबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना ट्विट केले आहे. सत्य शोधण्यासाठी माझे वकील कश्यपची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्टसाठी अर्ज करतील, असेही पायलने म्हटले आहे.

22 सप्टेंबर रोजी पायल घोष हिने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनुराग कश्यपची गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. सकाळी दहाच्या सुमारास तो पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून बाहेर पडला.

अनुरागने अभिनेत्री पायल घोषचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. पायलला वर्सोवा येथील आपल्या घरी कधीच बोलावले नाही. पायलला प्रोफेशनली ओळखतो, परंतु बऱ्याच दिवसांपासून तिला भेटलो किंवा तिच्याशी बोललो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

अनुरागने पायलला केलेले काही ईमेलही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. यात एका प्रोजेक्टबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली होती. याशिवाय अनुरागने पायलला पाठिंबा दर्शवलेले काही ट्विटही पोलिसांना दिले आहेत. पायलबरोबरच्या पहिल्या भेटीची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अनुरागच्या चौकशीदरम्यान पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*