अनुराग कश्यपकडून बलात्कार, पायल घोषची पंतप्रधान, गृह मंत्र्यांकडे न्यायासाठी विनवणी


चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप केल्यानंतरही मुंबई पोलीसांकडून त्याची दखल घेतली नसल्याने अभिनेत्री पायल घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायासाठी विनवणी केली आहे.(anurag kashyap and payal ghosh news)


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप केल्यानंतरही मुंबई पोलीसांकडून त्याची दखल घेतली नसल्याने अभिनेत्री पायल घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायासाठी विनवणी केली आहे.anurag kashyap and payal ghosh news

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने बलात्कार केल्याचा आरोप पायल घोषने केला होता. या प्रकरणी तिने पोलीसांत फिर्यादही दिली होती. केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या प्रकरणी मुंबई पोलीसांनी केवळ एकदा अनुराग कश्यपला चौकशीसाठी बोलावले होते.

पायलने पोलिस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अनुराग कश्यपची वर्सोवा पोलीस स्थानकात चौकशी झाली. यावेळी अनुरागने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते .मात्र, त्यानंतर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे पायलने पुन्हा एकदा ट्विट करत अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग केले आहे

anurag kashyap and payal ghosh news

या ट्विटमध्ये तिने म्हटले की,माझ्या मित्राने आणि व्यवस्थापकाने अनुराग कश्यपला माझा चित्रपट संदर्भ म्हणून पहायला सांगितला होता. कारण भविष्यात आम्ही एक प्रोजेक्टवर काम करणार होतो. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटणार देखील होतो.

मात्र, अनुराग कश्यप यांनी कोणतेही सत्य विचारात न घेता माझे आणि सहकलाकार ज्युनिअर एनटीआर यांच्यातील संबंध खराब केले होते. मी अजूनही न्यायाची वाट पाहत आहे. या आधीही पायलने एका ट्विटद्वारे पीएम मोदींकडे मदत मागितली होती. ही माफिया गँग माझी हत्या करेल आणि वरुन ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं सिद्ध करतील.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती