Antlia Bomb Scare Explosive car linked to Indian Mujahideen, phone seized from Tihar Jail

Antlia Bomb Scare : विस्फोटक आढळलेल्या कारचे इंडियन मुजाहिद्दीनशी कनेक्शन, तिहार तुरुंगातून फोन जप्त

25 फेब्रुवारी रोजी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाच्या तारा आता इंडियन मुजाहिद्दीनशी जोडल्या गेल्या आहेत. दिल्लीच्या तिहारमधील इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरजवळ फोन सापडला आहे. Antlia Bomb Scare Explosive car linked to Indian Mujahideen, phone seized from Tihar Jail


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 25 फेब्रुवारी रोजी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाच्या तारा आता इंडियन मुजाहिद्दीनशी जोडल्या गेल्या आहेत. दिल्लीच्या तिहारमधील इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरजवळ फोन सापडला आहे.

तिहारमधील सर्च ऑपरेशनदरम्यान स्पेशल सेलने फोन हस्तगत केला. इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी तहसीन अख्तर हा तिहार जेल क्रमांक आठमध्ये कैदेत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात पीएम मोदींच्या मेळाव्यात हैदराबाद आणि बोधगया येथे झालेल्या स्फोटांचा आरोप तहसीन अख्तरवर आहे.

तुरुंगातून उघडले टेलिग्राम चॅनेल

तहसीनकडून जप्त केलेल्या मोबाइलवर टेलिग्राम चॅनेल सक्रिय केल्याची माहिती समोर आली आहे. टॉर ब्राउझरद्वारे डार्क नेटवर व्हर्च्युअल नंबर तयार केला गेला होता आणि नंतर अँटिलियाजवळ स्फोटके आणि नंतर धमकी देणारी पोस्ट तयार केली गेली. विशेष पथक आता तहसीनची चौकशी करणार आहे.फोनचे लोकेशन सायबर सेलने केले उघड

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका खासगी सायबर एजन्सीच्या मदतीने पोलिसांनी ज्या फोनवर टेलिग्राम चॅनेल बनविले होते, त्याचे लोकेशन शोधले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी टेलिग्राम अॅपवर हे चॅनेल लाँच केले गेले होते आणि वाहन अंबानींच्या निवासस्थानाबाहेर लावण्याची जबाबदारी असल्याची पोस्ट 27 फेब्रुवारीच्या रात्री अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. संदेशामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे भरण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये एक दुवाही देण्यात आला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणीदरम्यान हा दुवा उपलब्ध नसल्याचे आढळले, त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांना संशय आला की कोणीतरी खोडसाळपणा केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख अंबानीच्या आलिशान ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एका एसयूव्हीमध्ये (स्कार्पिओ) अडीच किलो जिलेटिन स्टिक्स (स्फोटक पदार्थ) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

Antlia Bomb Scare Explosive car linked to Indian Mujahideen, phone seized from Tihar Jail

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*