विशेष प्रतिनिधी
मुंबई – उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर ठेवण्यात आलेली स्फोटके, त्याचा मास्टर माइंड आणि त्यानंतर झालेली मनसुख हिरेन यांची हत्या हे मूळ विषय आहेत. तुम्ही (पत्रकार) विषयाला बगल देऊ नका, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केले. antilia scare and mansukh hiren murder case are main issues, says sharad pawar
हे विधान म्हणजे बाण कोणाचा दिशेने सोडला आहे, याची चर्चा आता सोशल मीडियात जोरात सुरू आहे. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारी त्यांचे इनफ इज इनफ हे वाक्य सोशल मीडियात चर्चेचे ठरले… पण त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी मूळ विषय कोणते हे सांगितले… त्याकडे त्यावेळी दुर्लक्ष झाले. परंतु, आता सोशल मीडियात त्याच वक्तव्याची चर्चेने जोर पकडल्याचे दिसते आहे.
या सर्व प्रकरणात निर्णय ज्यांना घ्यायचा आहे, ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गेले दोन दिवस मौन बाळगून आहेत.
स्फोटके ठेवण्याचा कट
मुकेश अंबानींच्या निवासस्थानजवळ स्फोटके ठेवण्याचा कट मुंबईतील बड्या अलिशान हॉटेलमध्ये ठरला होता. सचिन वाझेंच्या संदर्भात ही आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्फोटके ठेवण्याचा कट हा मुंबईतील अलिशान अशा ट्रायडंट हॉटेलमध्ये शिजला होता अशी माहिती मिळाली आहे.
एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान वाझे ट्रायडंटमध्ये राहात होते. एनआयएने हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. वाझे १६ फेब्रुवारीला वाझे इनोव्हा घेऊन हॉटेलमध्ये आले. तर 20 फेब्रुवारीला लँडक्रूझर प्राडोमधून ते हॉटेलच्या बाहेर गेले, हे सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये दिसत आहे.
दोन मोठ्या बॅगा घेऊन वाझे हॉटेलमध्ये जात असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. एवढंच नव्हे तर वाझे बनावट आधारकार्ड तयार करुन दुस-याच नावावर ट्रायडंटमध्ये राहात होते. या आधार कार्डावर त्यांनी फोटो स्वतःचा लावला होता. मात्र नाव दुसरेच लिहिले होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली.