एका पाठोपाठ एक प्रकरणे अंगावर आल्यावर संजय राऊतांना आठवली शिवसेनेची “मजबुरी”; युती तुटल्याबद्दल केली भाजपवर आगपाखड!!

प्रतिनिधी

मुंबई : एका पाठोपाठ एक भ्रष्टाचाराची आणि गुन्हेगारीची प्रकरणे महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारच्या अंगलट यायला लागल्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांना आज शिवसेनेची मजबुरी आठवली.antilia bomb scare case; sanjay raut blames BJP leaders for current mess in maharashtra politics

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी आहे आणि हे सर्व भाजपमुळे झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर प्रचंड आगपाखड केली. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीला भाजपलाच जबाबदार धरले.राऊत म्हणाले, की तिन्ही पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. पण आम्ही हिंदुत्वाशी कुठलीही तडजोड केली नाही आणि हिंदुत्वाचा अजेंडा बदलला नाही. सुशांत सिंह राजपूत आणि कंगना राणावत प्रकरणात भाजपला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर विश्वास नव्हता. पण आता त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून भाजपने रान उठवले आहे,

असं राऊत म्हणाले. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माहिती दिली होती. पण परमबीर सिंग यांनी त्यांना काय सांगितले हे आपल्याला माहिती नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी परमबीर सिंग यांच्या पत्राच्या टायमिंगवरूनही शंका उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पत्रकार परिषद घेत असताना परमवीर सिंगांचे पत्र उजेडात येते. हे सर्व पूर्वनियोजित असल्याचा आरोप राऊतांनी केला.

संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्राचे पोलीस दल मोठे आहे. त्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक या छोट्या पदावरील व्यक्ती मोहरा कसा असेल? मुकेश अंबानींच्या घरासमोर कारमध्ये आढळून आलेल्या स्फोटके प्रकरणाला जाणून बुजून हवा दिली जात आहे, असे राऊत म्हणाले.

अँटिलिया स्फोटक प्रकरणाला ज्येष्ठ नेते शरद पवारांनी महत्त्वाचे ठरविले आहे. त्याचा तपास करायला हवा असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर आलेल्या राऊतांच्या वरील वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवसेना – राष्ट्रवादीत दरार पडल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

antilia bomb scare case; sanjay raut blames BJP leaders for current mess in maharashtra politics

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*