जन्मलेल्या बाळामध्ये आढळली कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे, जगातील अशा प्रकारचे पहिलेच प्रकरण समोर

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क – गर्भवती असताना कोरोना प्रतिबंधक लस दिलेल्या एका महिलेने जन्म दिलेल्या बाळाच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधातील प्रतिपिंडे आढळल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण समोर आले असल्याचा अंदाजही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. Antibodies to corona found in newborns, the first case of its kind in the world

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर दोघींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा प्रकारचे हे पहिलेच ज्ञात प्रकरण असून याबाबत अधिक अभ्यास सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येथील माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला ३६ महिन्यांची गर्भवती असताना तिला मॉडर्ना कंपनीने विकसीत केलेली कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आला. लसीकरणानंतर तीन आठवड्यांती संबंधित महिला प्रसूत होऊन तिने एका निरोगी बालिकेला जन्म दिला.

जन्मानंतर लगेचच या मुलीच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासले असता त्यात कोरोना विषाणूविरोधातील प्रतिपिंडे असल्याचे आढळून आले. मुलीच्या आईला पुढील आठवड्यातच नियमाप्रमाणे लशीचा दुसरा डोस देण्यात आला.

Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra
Corona Update: More than 25,000 patients in Maharashtra

Antibodies to corona found in newborns, the first case of its kind in the world

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*