Anti-India propaganda Oprating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website

कॅनडातून हलताहेत भारतविरोधी अपप्रचाराची सूत्रे, Poetic Justice Foundationच्या वेबसाइटवर आंतरराष्ट्रीय कटाची रूपरेषा

केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. यावर आंतराष्ट्रीय स्तरावरून भारताविरोधी कट रचला जात नुकतेच उघड झाले. परंतु, आता असेही काही पुरावे समोर आले आहेत, ज्यावरून जगभरातील सेलिब्रिटींनी भारतविरोधी ट्वीट करणे एका सुनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे दिसते. Anti-India propaganda Operating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. यावर आंतराष्ट्रीय स्तरावरून भारताविरोधी कट रचला जात नुकतेच उघड झाले. परंतु, आता असेही काही पुरावे समोर आले आहेत, ज्यावरून जगभरातील सेलिब्रिटींनी भारतविरोधी ट्वीट करणे एका सुनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे दिसते. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले ज्यामध्ये तिने गुगल डॉक्युमेंट्सची लिंक शेअर केली होती.

ग्रेटाने शेअर केलेल्या त्या डॉक्युमेंट्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा कसा विरोध करायचा याची सुनियोजित रूपरेखा होती. या ट्विटनंतरच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. ट्रोलिंग सुरू होताच ग्रेटाने ते ट्वीट हटवले. ग्रेटाने केलेल्या ट्वीटमध्ये मागच्या नोव्हेंबरपासूनच शेतकरी आंदोलन चिघळवण्याची पूर्वतयारी असल्याचे दिसून आले.

या सर्वांच्या मूळाशी जायचे तर याचे उत्तर कॅनडात मिळेल. तेथील पोएटिक जस्टिस फाउंडेशन या फारशा प्रसिद्ध नसलेल्या संस्थेने शेतकरी आंदोलनात केव्हा, काय करायचे याची पूर्ण रूपरेषा आपल्या वेबसाइटवर आखलेली दिसून येते.

Anti-India propaganda Oprating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website

या पोएटिक जस्टिस फाउंडेशनच्या वेबसाइटवर शेतकरी आंदोलनाबाबत अनेक चिथावणीखोर लेखांची भरमार आहे. संकेतस्थळावरील एका लेखात असे लिहिलेय की, भारत सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये एक विधेयक मंजूर केले जे देशातील शेतकर्‍यांना हानिकारक आहे. शेती हा एक उद्योग आहे जो भारतातील सुमारे 50 टक्के लोकांना रोजगार देते.या चिथावणीखोर लेखात असे लिहिले आहे की, लोकांना पोलिसांचे क्रौर्य, सेन्सॉरशिप आणि राज्य प्रायोजित हिंसेचा सामना करावा लागतोय. लेखानुसार, भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे उदाहरण म्हणून दर्शवली जाते, परंतु या प्रजासत्ताक दिनी संपूर्ण जगाने कथित लोकशाही सरकारने स्वतःच्याच लोकांना ठार मारताना पाहिले आहे. लेखात पुढे असे लिहिले आहे की, भारत वेगाने फासिस्ट, हिंसक अत्याचारी राजवटीकडे वाटचाल करत आहे.

कॅनडातील ही वेबसाइटच खरी सूत्रधार?

Anti-India propaganda Oprating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website

या संकेतस्थळाने दोन आठवड्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांत याचिका दाखल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. संयुक्त राष्ट्राने लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून असहमत होण्याचे स्वातंत्र्य भारताने सुनिश्चित करावे अशी मागणी केली आहे.

यात असाही दावा आहे की, “भारताने शिखांच्या आंदोलनाला सामूहिक बलात्कार, छळ आणि नरसंहार करून उत्तर दिले.” या याचिकेवर आतापर्यंत 1500 लोकांनी ऑनलाइन स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Anti-India propaganda Oprating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website

केंद्राने शेतीविषयक कायदे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव, एमएसपी व कायद्यांतील दुरुस्त्यांबाबत आश्वासन देऊनही शेतकरी संघटनांनी कायदाच रद्दबातल करण्याची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला जागतिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावरून दिसून येते. दरम्यान, केंद्राने या सर्व गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची अत्यंत गरज आहे.

Anti-India propaganda Operating from Canada, revealed from Poetic Justice Foundations website

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*