बिहारमध्ये कॉंग्रेसला आणखी एक दणका, ११ आमदार एनडीएमध्ये जाण्याच्या तयारीत

बिहारमध्ये कॉंग्रेसला आणखी दणका बसणार आहे. पक्षाच्या १९ पैकी ११ आमदार पक्षत्याग करून एनडीएमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था आणखीनच वाईट होणार आहे. Another Shock to Bihar Congress, 11 MLAs preparing to join NDA


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये कॉंग्रेसला आणखी दणका बसणार आहे. पक्षाच्या १९ पैकी ११ आमदार पक्षत्याग करून एनडीएमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था आणखीनच वाईट होणार आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्या पराभवातून काँग्रेस आणखी सावरलेली नाहीय. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरु आहे. अशातच बिहारमध्ये काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वतुर्ळात जोर धरला आहे. कारण कारण बिहारमधले काँग्रेसचे 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने सक्रीय होत संघटनात्मक बदल केले. काँग्रेस आता सावरतीय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे 11 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत.

काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता माजी आमदार भरत सिंह यांनी वर्तवली आहे.

Another Shock to Bihar Congress, 11 MLAs preparing to join NDA

काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांच्याकडे बिहारचं काँग्रेस प्रभारीपद होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी काँग्रेस हायकमांडला केली होती. त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त केलं. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खांदेपालटानंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे. राजद आणि भाजप आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*