जॅक मा यांना चिनी माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा आणखी एक दणका; उद्योगपतींच्या यादीतून वगळले

वृत्तसंस्था

शांघाय : कम्युनिस्ट राजवटीशी घेतलेला पंगा गर्भश्रीमंत उद्योगपती जॅक मा यांना चांगलाच महागात पडू लागला आहे. सरकारने त्यांना आता आणखी एक दणका दिला आहे. चीनी सरकारने अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांचे नाव आता उद्योजकांच्या यादीतूनही वगळले आहे. या निर्णयामागे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रशासनाशी जॅक मा यांचे बिघडलेले संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. Another blow to Jack Ma from the Chinese Maoist Communist Party

केवळ चीनच नव्हे तर जगातील आघाडीचे उद्योजक असणारे जॅक मा यांचे नाव सरकारी माध्यम शांघाय सिक्युरिटीज न्यूजच्या पहिल्या पानावरही घेतलेले नाही. सरकारी माध्यमातूनही त्यांचे नाव उद्योजकांच्या यादीतून हटविले आहे. दुसरीकडे हुवेई टेक्नॉलॉजीचे रेन झेंगफेई, शाओमीचे ली जून आणि बीवायडीचे वांग चाऊंफू यांचे मात्र सरकारी माध्यमांनी कौतुक केले आहे.जॅक मा यांनी चीनच्या सरकारला प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याचे जाहीर आवाहन केले होते. चीनमध्ये नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि यात बदल करावा, असे जॅक मा यांचे म्हणणे होते.

त्यानंतर चिनी सरकारने त्यांच्याविरोधात कारवाईचे हत्यार उपसले. मा यांच्याविरोधात अनेक प्रकरणे उकरून काढली जात आहेत. एकदा त्यांनी जागतिक बँकेच्या नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ असे संबोधले होते. या भाषणानंतर चीनचा सत्तारूढ कम्युनिस्ट पक्ष भडकला. त्यानंतर जॅक मा यांच्या व्यवसायाच्या नाड्या आवळण्यास सुरवात झाली. हा ससेमिरी दिवसेंदिवस कडक होत चालला आहे.

Another blow to Jack Ma from the Chinese Maoist Communist Party

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*