अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर ममतांना अजून एक मोठा झटका… हिंसाचाराने व्यथित खासदार दिनेश त्रिवेदी भाजपात जाणार?


“माझ्या राज्यात हिंसा सुरु आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतोय”, अशी खदखद दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केली.


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रसेच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत बोलता बोलता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.Another big blow to Mamata Banerjee after Amit Shah’s visit to Bengal. Will he join BJP?

“राज्यसभेचा खासदार असूनही राज्यातील हिंसाचारावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे घुसमट होतेय”, अशी प्रतिक्रिया देत त्रिवेदी यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अमित शाह जेंव्हा जेंव्हा बंगाल दौर्यावर जातात तृणमूल ला घरघर लागते.आता तयांच्या बंगाल दौऱ्यानंतर ममता बॅनर्जींना अजून एक मोठा झटका बसला आहे . 

माझ्या राज्यात हिंसा सुरु आहे आणि मी काहीच करु शकत नाहीय. माझी अंतरात्मा मला सांगतेय, इथे बसून जर काही करु शकत नाही तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे मी राजीनामा देतोय. मात्र, मी राजीनामा दिल्यानंतरही बंगलाच्या लोकांचं काम करत राहील”, अशा शब्दांत त्रिवेदी यांनी आपल्या भावना राज्यसभेत बोलून दाखवल्या .हा ममता दीदींना मोठा झटका आहे कारण  याआधी ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जाणारे शुभेंदु अधिकारी, मुकूल रॉय सारख्या बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे .त्रिवेदी देखील भाजप प्रवेशासाठी सकारात्मक असल्याची चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Another big blow to Mamata Banerjee after Amit Shah’s visit to Bengal. Will he join BJP?

दरम्यान, दिवेश त्रिवेदी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी त्रिवेदी यांना भाजपात येण्याचं खुलं आमंत्रण दिलं आहे. “दिनेश त्रिवेदी वर्षभरापूर्वी मला एका विमानतळावर भेटले होते. तेव्हा परिस्थिती खूप विचित्र आहे. त्यामुळे काम करु शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी आता टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपात आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करु”, 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*