दिल्लीत खान मार्केटमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांकडूननी चौकशी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. Announcement of Pakistan Zindabad at Khan Market in Delhi

काही जण खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, अशी तक्रार मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.मध्यरात्री एकच्या सुमारास तुघलक रोड पोलीस ठाण्याचा फोन खणखणला. खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ काही जण ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. तपास अधिकारी तिथे पोहोचला, त्यावेळी दोन पुरुष, तीन महिला बाईकवर बसले होते. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यानंतर आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. आम्ही बाईक भाडयावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

“बाईक हातात असल्याने वेगात बाईक पळवण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळया देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो. एक जण त्यातला पाकिस्तानातून आला होता. त्याने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

Announcement of Pakistan Zindabad at Khan Market in Delhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था