Anil Deshmukh will not resign as Home Minister, decision taken at a meeting held at Sharad Pawars house

अनिल देशमुखांकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान रविवारी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. कमलनाथ या बैठकीत कॉंग्रेसकडून सहभागी झाले होते. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. ते म्हणाले की, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. एटीएस आणि एनआयए तपास करत आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान रविवारी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. कमलनाथ या बैठकीत कॉंग्रेसकडून सहभागी झाले होते. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. ते म्हणाले की, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. एटीएस आणि एनआयए तपास करत आहेत.

अनिल देशमुखांचा राजीनाम घेणार नाही राष्ट्रवादी

जयंत पाटील म्हणाले की, अधिकारी कितीही मोठा असला तरी राज्य सरकार चांगली चौकशी करेल. हा सरकारचा निर्णय आहे. या पत्रावरून तपास विचलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याक्षणी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही.

पवारांच्या घरी 2 तास चालली बैठक

नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांच्यासारखे बडे नेतेही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणावरून पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक सुमारे 2 तास चालली. बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप झाल्यानंतर आघाडी सरकारविरोधात आंदोलनाने जोर धरला आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या घरी झालेली आघाडीच्या नेत्यांची बैठक अनेक कारणांनी महत्त्वाची मानली जाते.

ज्युलिओ रिबेरो यांचा चौकशीला नकार

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांनी केलेल्या कोणत्याही आरोपांची चौकशी करणार नसल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट केले की, मनसुख हिरेन हत्याकांडाचा गुंता सुटला आहे. हे प्रकरण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गुंतागुंतीचे प्रकरण होते.

वळसे होणार नवे गृहमंत्री?

याआधी अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी दिलीप वळसे यांना हे स्थान दिले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दिलीप वळसे हे सध्या ठाकरे सरकारमध्ये कामगार व उत्पादन शुल्क मंत्री आहेत. यामुळेच वळसे हे महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री होऊ शकतात, असा कयास बांधण्यात येत होता. मात्र, पक्ष किंवा सरकारकडून याबाबत कोणतेही विधान आलेले नाही.

पवार म्हणाले, देशमुखांचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

त्याचबरोबर रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या वसुलीचे आरोपांना गंभीर म्हटले. परंतु या संदर्भातील चौकशीनंतर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा प्रभावित होणार नाही, असेही ते म्हणाले. पवार म्हणाले की, सचिन वाझे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी नव्हे, तर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा नियुक्त केले. परंतु देवेंद्र फडणवीसांनी वाझेंची नियुक्ती मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच झाल्याचा आरोप करत पवारांनी अर्धसत्य सांगितल्याचे म्हटले आहे.

देशमुखांच्या राजीनाम्यापर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहणार

वास्तविक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप ठाकरे सरकारवर सातत्याने हल्ला करत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पण उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत आपले सरकार वाचवायचे आहे. फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून हटवावे लागेल, त्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील.

इतर महत्त्वाच्या बातम्या

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*