अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद जाणार ? ; स्फोटक तपास प्रकरणी शरद पवार नाराज

वृत्तसंस्था

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या प्रकारे हाताळलं आहे, त्यावरुन पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांच पद जाऊ शकतं, अशी चर्चा सुरु झाली आहे.Anil Deshmukh to become Home Minister Sharad Pawar upset over explosives probe

आज देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी पवार यांनी राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गृह विभागाच्या कामकाजाविषयी माहिती घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले.शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुख म्हणाले, अंबानी याच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. एनआयएला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याच्या तपासावरुन शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.

दिल्लीत शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात तासभर चर्चा सुरु होती.  मुंबईच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, “स्फोटकं प्रकरणी एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.”

Anil Deshmukh to become Home Minister Sharad Pawar upset over explosives probe

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*