बलुचि नेत्या करीमा बलोच यांच्या मृत्यूचा संताप

  • फ्रान्समध्ये जोरदार निदर्शने : न्याय देण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

पॅरिस : पाकिस्तानातील बलुचिस्तान येथील नेत्या आणि मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या करीमा बलोच यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी शेकडो जणांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जोरदार निदर्शने केली. Anger over the death of Baluh leader Karima Baloch

फ्रान्समधील कॅनेडियन दूतावासाबाहेर बलुच, पश्तून, हजारा आणि फ्रेंच नागरिक जमा झाले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली.  टोरंटोमध्ये 22 डिसेंबर 2020 रोजी करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह एका तलावाजवळ आढळला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.पाकिस्तानातील बलुची नागरिकांना अमानवीय वागणूक दिली जात आहे. त्याविरोधात त्यांनी आवाज उठविला होता. 2015 मध्ये त्या पाकिस्तानच्या त्रासाला कंटाळून कॅनडाला स्थलांतरीत झाल्या होत्या.

Anger over the death of Baluh leader Karima Baloch

तेथे त्यांनी बलुची लोकांच्या आवाज बुलंद केला होता. पाकिस्तानी गुप्तहेरानी त्यांची हत्या केली आहे, असा आरोप कॅनडातील पाकिस्तानी, बलुची नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*