उत्तर प्रदेशात बदायूँमध्ये अंगणवाडी सेविकेवर नृशंस बलात्कार, दोघांना अटक; पोलिस अधिकारी निलंबित

उत्तरप्रदेशातील बदायूँ जिल्ह्यामध्ये 50 वर्षीय महिलेवर दोघांनी मंदिरात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेचा मृत्यू झाल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. Anganwadi worker brutally raped in Uttar Pradesh, two arrested; Police officer suspended


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तरप्रदेशातील बदायूँ जिल्ह्यामध्ये 50 वर्षीय महिलेवर दोघांनी मंदिरात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेचा मृत्यू झाल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली असून एक पोलीस अधिकारी निलंबित झाला आहे.

ती महिला उगाहाती परिसरातील मंदिरात गेली होती. पण ती परत आली नाही. शवविच्छेदनअहवालात बलात्कार केल्याचा आणि तिच्यात रॉड खुपल्यची जखम आणि पायात फ्रॅक्चर असल्याची पुष्टी केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येसंदर्भात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी निलंबित झाला असून दोन आरोपींना अटक झाली आहे.

ही महिला अंगणवाडी सेविका होती. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती. मृत महिलेच्या मुलाच्या म्हणण्यानुसार मंदिराचे पुजारी व इतर दोन जण घरी आले होते आणि त्यांना काही विचारण्यापूर्वीच तेथून निघून गेले होते.

पुजाऱ्याने सांगितले की ती बाई विहिरीत पडली होती. तिने मदतीसाठी याचना केल्याने तो व इतर दोन जण विहिरीकडे गेले. महिलेच्या नातेवाईकांची माहिती मिळाल्यावर त्याने तिला तिच्या घरी सोडले.

पीडितेच्या कुटूंबाने पुजार्‍यावर बलात्कार आणि खुनाचा आरोप केला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला आहे. सोमवारी सकाळी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.्र

Anganwadi worker brutally raped in Uttar Pradesh, two arrested; Police officer suspended

शवविच्छेदन अहवालात बलात्काराची पुष्टी झाली असून तिच्या खासगी भागात जखम व पायात फ्रॅक्चर असल्याचे आढळले आहे. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.त्यांना तीन जणांची नावे देण्यात आली आहेत. आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार केल्याची माहिती बदायूंचे पोलीस अधिकारी संकल्प शर्मा यांनी दिली आणि लवकरच दोषींना अटक केली जाईल, अशी ग्वाही दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*