अमृता फडणवीस यांचे गाणे फेसबुक आणि युट्यूबवर गाजतय


वृत्तसंस्था

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच गाणं फेसबुक आणि युट्यूबवर गाजत आहे. खास व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांनी हे गाणं सादर केले आहे. Amrita Fadnavis’s song hit on Facebook and YouTube

व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले. अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. यापूर्वी त्यांनी अनेक गाणी सादर केली आहेत. यावेळी मात्र, व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने खास गाणे सादर केले.‘ये नयन डरे डरे’ असे गाण्याचे नाव असून ते एका समुद्र किनाऱ्यावर चित्रित केले आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचे सोशल मीडियावर समर्थकांनी मोठे स्वागत केले.

अमृता यांच्या रेड गाऊनमधील फोटोची दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होती. त्या फोटोला एक कॅप्शनही दिलं. त्यामधून त्या काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं सूचवलं होतं. अखेर व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे खास गाणं रिलीज केले.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘फिर से’ या गाण्याचं लाँचिंग बच्चन यांच्या हस्ते मुंबईत झालं होतं.

Amrita Fadnavis’s song hit on Facebook and YouTube

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी