सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगड करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. सध्या होमगार्ड प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे व पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे अवघा देश ढवळून निघत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारचे नाव न घेता टीका केली आहे. आपल्या ट्वीटच्या अखेरीस त्यांनी सचिन वाझे आणि टार्गेट 100 करोड असा हॅशटॅग वापरला आहे. Amrita Fadnavis criticizes in shayari on Twitter after Parambir singh letter
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगड करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. सध्या होमगार्ड प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे व पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे अवघा देश ढवळून निघत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारचे नाव न घेता टीका केली आहे. आपल्या ट्वीटच्या अखेरीस त्यांनी सचिन वाझे आणि टार्गेट 100 करोड असा हॅशटॅग वापरला आहे.
अमृता फडणवीस यांचे ट्वीट
अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी दोन ओळींत त्यांनी नेमक्या शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. या ओळींद्वारे ठाकरे सरकारचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे.
“बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनों की जान जाएगी?”
असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
हेही वाचा…
- Parambir Singh letter : गृहमंत्र्यांच्या अनिल देशमुखांच्या हप्ते वसुली आदेशाचा ‘हा’ आहे पुरावा, वाचा परमबीर सिंहांनी दिले चॅटिंगचे डिटेल्स
- Parambir singh Letter : राज ठाकरे कडाडले, महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा, अनिल देशमुखांची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी करा
- Parambir singh letter Bomb : मोहन डेलकर प्रकरणातही गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप, कायद्याच्या दृष्टीने योग्य नसतानाही मुंबईत दाखल करायचा होता गुन्हा
- Big Breaking News; परमबीर सिंगांचा मुख्यमंत्र्यांकडे लेटर बाँम्ब, अनिल देशमुखांनी १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले; देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा वाचलाय पाढा!!; शरद पवार, अजित पवारांना घेरले
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘बादशाह’ असा उल्लेख केलाय. आता हा बादशाह म्हणजे नेमकं कोण हे स्पष्ट होत नसलं तरी त्यांचा रोख मुख्य आरोपीकडे असल्याचा अंदाज लावता येतो. या बादशहाला वाचवण्यात आणखी किती जणांचा बळी जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणारा कोण, सचिन वाझेवर कुणाचा वरदहस्त हे प्रश्न ताजे असतानाच आता अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रकरण आणखी मोठे असल्याची चर्चा सुरू आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रातून केला आहे. यासाठी पुराव्यादाखल त्यांनी आपल्या चॅटिंगचा काही भागही शेअर केला आहे. जवळपास 8 पानांचे हे सविस्तर पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पत्रानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अनिल देशमुखांच्या तत्काळ राजीनाम्याची तसेच उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.