उद्योगपतींना भीती दाखवून वसुली करण्याची सरकारची हस्तकांकरवी योजना, अमृता फडणवीस यांचा आरोप

एनआयएने सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योगपतींना भीती दाखवून वसुली करण्याची सरकारची आपल्या हस्तकांकरवी योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Amrita Fadnavis alleges government’s manipulative plan to intimidate industrialists


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनआयएने सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योगपतींना भीती दाखवून वसुली करण्याची सरकारची आपल्या हस्तकांकरवी योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.उद्योगपती मुकेश अंबानींच्या अ‍ॅँटेलिया या निवासस्थानासमोर स्फोटके सापडली होती. घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएने तपास सुरू करत सचिन वाझे यांना अटक केली. यावरून अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरेप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पक्षानेही यावर टीका करत म्हटले आहे की, चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबते सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब? असं म्हणत भाजपाने सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकांबद्दल सवाल उपस्थित केला आहे.

Amrita Fadnavis alleges government’s manipulative plan to intimidate industrialists

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*