अमीर खानच्या तोंडाला मास्क नाही; गाजियाबादमध्ये मोडला कोरोना नियम; पोलीस तक्रार दाखल


  • लालसिंग चड्डा सिनेमाच्या प्रमोशन मधला प्रकार

वृत्तसंस्था

गाजियाबाद : इस्लामी तुर्कस्तानमध्ये “सुरक्षित” वाटणाऱ्या आणि भारतात “असुरक्षित” वाटणाऱ्या आमिर खानने कोरोना प्रोटोकॉल तोडला आहे. गाजियाबादमध्ये गर्दी करून चाहत्यांना भेटताना त्याने तोंडावर मास्क लावला नव्हता. त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  amir-khan-news

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या वाढत्या संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आणि डॉक्टर्स मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. मात्र या सल्ल्याकडे आमिर खानने दुर्लक्ष केलेले दिसले. भाजपा नेता नंद किशोर गुर्जर यांनी आमिरविरोधात कोविडचा प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली आहे. amir-khan-news

आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सध्या गाजियाबादमध्ये आहे. यावेळी आमिरला भेटण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. आमिर देखील मोठ्या उत्साहाने आपल्या चाहत्यांशी संभाषण करत होता. परंतु यावेळी त्याने आपल्या तोंडावर मास्क किंवा फेसशिल्ड लावले नव्हते. परिणामी आमिरने कोविडचा प्रोटोकॉल मोडला आहे, असा आरोप नंद किशोर गुर्जर यांनी केला. लक्षवेधी बाब म्हणजे ते केवळ आरोप करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी आमिरविरोधात थेट पोलीस तक्रारही केली आहे.amir-khan-news

एरवी आमिर खान मोठ्या जाहिरातींमधून समाजाला नैतिक वर्तनाचे उपदेशाचे डोस पाजत असतो. तो काही सामाजिक उपक्रम राबवतो. परंतु करण्यासारख्या मारीत कोरोना महामारीत मात्र तो नियमभंग करताना आढळला आहे. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रतीक्षा आहे.

२४ तासांत ४६,९६३ नवीन रुग्ण

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तर सण-उत्सवानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात याचा प्रदुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशातील नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या आसपास गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ४६ हजार ९६३ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे.

amir-khan-news

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संक्या ८१ लाख ८४ हजार ८२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या पाच लाख ७० हजार ४५८ जणांवर उपचार सुरु आहेत. देशातील एकूण करोनाबळींची संख्या एक लाख २२ हजार १११ इतकी झाली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती