Amid Parambir Letter Controversy sharad pawar calls Ajit Pawar and Jayant Patil To Delhi

Parambir Letter : परमबीर यांच्या पत्रामुळे अनिल देशमुखांवर टांगती तलवार, शरद पवारांनी दोन बड्या नेत्यांना दिल्लीला बोलावले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावरील गंभीर आरोपामुळे (Parambir Letter) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील सक्रिय झाले आहेत. शरद पवार दिल्लीत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना बोलावले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला जाणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अँटिलिया प्रकरणाच्या तपासादरम्यान बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Letter) यांच्या एका पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. परमबीर सिंग यांनी सीएम उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टारगेट दिल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर अनिल देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावरील गंभीर आरोपामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील सक्रिय झाले आहेत. शरद पवार दिल्लीत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना बोलावले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला जाणार आहेत.

असे सांगितले जात आहे की, अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांवर चर्चा करून त्यांच्या भवितव्याचा फैसला या बैठकीत होऊ शकतो. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर चोहोबाजूंनी दबाव वाढला आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अँटिलिया प्रकरणाची चौकशी एनआयए करत आहे. तपासादरम्यान ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागात बदली केली. शनिवारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आरोप केला की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील 1750 बिअर बार व इतर आस्थापनांमधून सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याचवेळी या विषयावर अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, परमबीर सिंग यांनी कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी असे आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या भवितव्याचा फैसला लवकरच होईल, असा कयास बांधला जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*