शेतकरी आंदोलनाचा कॉंग्रेसलाच फटका, अमरिंदरसिंग यांना कळले, पण राहुल गांधींना वळेना


पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका अंतिमत: कॉंग्रेसलाच बसणार आहे हे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना कळले आहे. पण राहुल गांधी यांना मात्र हे समजत नसल्याने आता या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी पंजाबमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सिंघू सीमेवर तैनातही केले आहे. Amarinder Singh knew that the farmers’ movement was a blow to the Congress, but he did not turn to Rahul Gandhi


वृत्तसंस्था

चंडीगढ : पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका अंतिमत: कॉंग्रेसलाच बसणार आहे हे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना कळले आहे. पण राहुल गांधी यांना मात्र हे समजत नसल्याने आता या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी पंजाबमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सिंघू सीमेवर तैनातही केले आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकरी आंदोलनाकडे राजकीय संधी म्हणून पाहत आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने हल्लाही चढवित आहेत. मात्र, या आंदोलनामुळे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने हात-पाय पसरले याची पूर्ण जाणीव अमरिंदरसिंग यांन आहे. त्यामुळे पडद्यामागून शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) दोन आणि एका कृषि तज्ज्ञाला त्यांनी सिंघू बॉर्डरवर पाठविले आहे. आंदोलक शेतकऱ्यांमधील उदारमतवादी नेत्यांशी बोलणी करण्यास त्यांना सांगितले आहे.

कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्यापेक्षा त्यामध्ये काही बदल करून ते स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गेल महिन्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी शहा यांनी त्यांना कृषी आंदोलनाचे पंजाबवर गंभीर परिणाम होतील असे सांगितले होते. पंजाबमधील पुर्वीची अशांतता आणि जुना रक्तरंजित इतिहास यांची आठवण करून दिली होती. अमरिंदरसिंग म्हणाले होते की हा प्रश्न लवकरात लवकर मिटावा यासाठी प्रयत्न करत आहे. आंदोलन चिघळल्यास पंजाबच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशाच्या सुरक्षिततेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

Amarinder Singh knew that the farmers’ movement was a blow to the Congress, but he did not turn to Rahul Gandhi

त्यापेक्षाही महत्वाचे कारण म्हणजे राहुल गांधी जरी शेतकरी आंदोलनातून कॉंग्रेसचा फायदा पाहत असले तरी अमरिंदरसिंग यांना वेगळीच भीती वाटत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी आम आदमी पार्टीही मैदानात उतरली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हा प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.
अमरिंदरसिंग यांचे अधिकारी शेतकरी नेत्यांशी बोलणी करत असले तरी त्याला अधिकृत स्वरुप दिलेले नाही. शेतकरी कोठेपर्यंत मागे येण्यास तयार होतात याचा अंदाज घेत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती