मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर पिस्तुलाचा धाक दाखवत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक; प्रकरण गेले गृहमंत्र्यांपर्यंत


विशेष  प्रतिनिधी

पुणे : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओमुळे सोशल नेटवर्किंगवर एकच खळबळ उडली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील असल्याचे जलील यांचे म्हणणे आहे. व्हिडीओमध्ये रात्रीच्या वाहतूक कोंडीमध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. Alleged shiv sainik threatens with pistol on pune – Mumbai express way

धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावरील वाघ हे चिन्ह दिसत आहे. याच कारणामुळे जलील यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केलीय.



“हे (दृश्य) महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आहे. वाहनवरील लोगो सर्व काही सांगत आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का?”,असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये जलील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिस डीजीपींनाही टॅग केले आहे.

 

या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात धरलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसते आहे.

हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून जलील यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या चालकाला अटक करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. हा महाराष्ट्र आहे युपी-बिहार नाही असं म्हणत एकाने संबंधित चालकावर कारवाई करावी असे म्हटले आहे. अनेकांनी गाडीचा क्रमांक या व्हिडीओत स्पष्ट दिसत असल्याने चालकाला शोधण्यास काही अडचण येणार नाही असेही नमूद केले आहे.

Alleged shiv sainik threatens with pistol on pune – Mumbai express way

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती