जगतापांच्या भाईगिरीविरोधात अखिल भारतीय कॉँग्रेस सदस्याची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या ‘भाईगिरी’विरोधात अखिल भारतीय कॉँग्रेसच्या सदस्याने थेट अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. भाई जगताप मनमानी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.All India Congress member’s direct complaint to Sonia Gandhi against Jagtap’s Bhaigiri


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या ‘भाईगिरी’विरोधात अखिल भारतीय कॉँग्रेसच्या सदस्याने थेट अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. भाई जगताप मनमानी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय कॉँग्रेसचे सदस्य विश्वबंधू राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भाई जगताप यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वाईट काळात कॉंग्रेसला पाठिंबा देणाºया मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजातील कोणत्याही व्यक्तीला जिल्हाध्यक्ष केले गेले नाहीअसा आरोप करताना त्यांनी म्हटले आहे की, भाई जगताप यांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव सदानंद भिकाजी चव्हाण यांना मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि पुतणे अनंत बबन जाधव यांना सचिव म्हणून नियुक्त केले आहे. कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी त्यांचे व्याही अब्दुल अहाब खान यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे.

मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार संजय निरुपम यांनीही वाहत्या गंगेत हात धूत आपला भाऊ अंजय ब्रिजकिशोरलाल श्रीवास्तव यांना सरचिटणीस केले आहे. निरुपम समर्थक जयप्रकाश काशिनाथ सिंह यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर जयप्रकाश सिंह यांनी जुगाड लावत त्यांचा मुलगा धीरज सिंग यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त केले.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यावरही राय यांनी आरोप केले आहेत. ते म्हणाले, वेणुगोपाल यांची एवढी चलती आहे की, त्यांनी तीन दक्षिण भाषिकांना जिल्हाध्यक्ष बनवून मुंबई मनपा निवडणुकीत पक्षाला पराभूत करण्याचा श्रीगणेशा केला आहे. सुरु केले.

वेणुगोपाल यांच्यामुळे उत्तर पूर्वमध्ये दक्षिण भाषिक अब्राहम रोयमानी, उत्तर-मध्य मुंबईत जगदीश कुट्टी अमीन आणि उत्तर-पश्चिमेत क्लायव्ह डायस यांना जिल्हा-अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. मुंबई कॉंग्रेसच्या नवीन संघात दाखवण्यासाठी काही मुस्लिम समाजातील लोकांची नेमणूक करण्यात आली आहे,

परंतु मुंबई कॉंग्रेसच्या नवीन समितीमध्ये बड्या नेत्यांची ही पदे ‘या’ लोकांना दिली आहेत. माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान यांचे बंधू मोहम्मद शरीफ खान यांना उपाध्यक्ष आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचे पीए संतोष केशव बागवे यांना सचिव करण्यात आले. उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांची पत्नी नगरसेवक असून मुलगा यूथ काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आहे.

All India Congress member’s direct complaint to Sonia Gandhi against Jagtap’s Bhaigiri

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*