अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे बँक खाते घेतले ताब्यात

14 कोटींचा मालमत्ता कर भरला नाही; महापालिकेची कारवाई


विशेष प्रतिनिधी

अलिगड : अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे बँक खाते अलिगड महापालिकेने ताब्यात घेतले आहे. सुमारे 14 कोटी रुपयांचा मालमत्ता कर विद्यापीठाने भरला नसल्याने ही कारवाई तडकाफडकी केली आहे. Aligarh Municipal Corporation has seized bank account of Aligarh Muslim University

अलीगड महापालिकेचे मुख्य कर अधिकारी विनय कुमार राय म्हणाले, 14 कोटी 83 लाखांची थकबाकी विद्यापीठाची आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून मालमत्ता कर भरला नाही.त्यामुळे बँक खाते ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षीही असेच बँकेचे खाते गोठविले होते. त्यांना कर भरावा, अशा सूचना वारंवार करूनही दाखल घेतली नाही. त्यांना अनेकवेळा कर भरण्यासाठी संधी दिली होती. आता डोक्यावरून पाणी गेल्यामुळे खाते ताब्यात घेण्याची कारवाई करावी लागली.

Aligarh Municipal Corporation has seized bank account of Aligarh Muslim University

विद्यापीठ प्रशासनाला आठवड्याची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांनी मालमत्ता कर भरला नाही तर विद्यापीठाच्या खात्यातून थकीत कराची रक्कम अलिगड महापालिकेच्या खात्यात वर्ग करून घेतली जाईल, असा इशारा मुख्य कर अधिकारी विनय कुमार राय यांनी दिला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*