वृत्तसंस्था
मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारे अलेक्सी नवालनी यांना तेथील न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांच्या समर्थकांची सरकारने धरपकड सुरु केली आहे.Alexei Navalani jailed Sentenced to three and a half years thousands arrested
गेल्या महिन्यात रशियाला आगमन झाल्यावर अलेक्सी नवालनी यांना अटक झाली होती. त्यांच्यावर विषप्रयोगही झाला होता.नवालनी यांना अटक झाल्याचे समजताचसमर्थकांनी मॉस्को येथे जोरदार निदर्शने केली आहेत. हजारो लोकांना सरकारने तुरुंगात टाकले आहे.
नवालनी यांना 2014 मध्ये शिक्षा झाली होती. त्यावेळी काही अटी घातल्या होत्या. त्या अटींचे पालन केले नाही, असा ठपका ठेऊन न्यायालयाने त्यांना राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी कारावासात रवानगी केली आहे.