Alert: If PAN Card is not linked to Aaadhar by March 31, it will be inactive, Possibilty Of fine of Rs 10,000

Alert : PAN Card 31 मार्चपर्यंत Aaadhar शी जोडले नाही तर होईल निष्क्रिय, 10 हजार रुपये दंडही बसू शकतो

जर तुम्ही अद्यापही आपले पॅन कार्ड (Pan Card) आधारशी लिंक केले नसेल तर आजच करून घ्या. तुमच्याकडे फक्त 10 दिवसांचा वेळ आहे. इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2021 पर्यंत ठेवली आहे. यानंतर ज्यांचे पॅन आधारला लिंक नसेल, त्यांना त्याचा वापर करून केलेल्या व्यवहारासाठी 10 हजार रुपये दंड द्यावा लागेल. एवढेच नाही तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रियसुद्धा होऊन जाईल.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर तुम्ही अद्यापही आपले पॅन कार्ड (Pan Card) आधारशी लिंक केले नसेल तर आजच करून घ्या. तुमच्याकडे फक्त 10 दिवसांचा वेळ आहे. इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2021 पर्यंत ठेवली आहे. यानंतर ज्यांचे पॅन आधारला लिंक नसेल, त्यांना त्याचा वापर करून केलेल्या व्यवहारासाठी 10 हजार रुपये दंड द्यावा लागेल. एवढेच नाही तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रियसुद्धा होऊन जाईल.

असा आहे नियम

जर तुमचे PAN निष्क्रिय झाले असेल आणि तुम्ही स्वत:च्या बँक अकाउंटमधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त काढण्यासाठी त्या पॅन कार्डचा वापर करत असाल, तर तुम्हाला 10,000 रुपये दंड द्यावा लागेल. सोबत पॅन कार्डशिवाय तुम्हाला मोठी रक्कम काढताही येणार नाही. यासोबतच निष्क्रिय PAN मुळे अशा प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.

असे करा पॅन-आधारला लिंक

सर्वात आधी इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जा. आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करा. आधार कार्डमध्ये फक्त जन्माच्या वर्षाचा उल्लेख असेल तर चौकटीला टिक करा. आता कॅप्चा कोड एंटर करा. यानंतर Link Aadhaar बटणावर क्लिक केल्यावर तुमचे पॅन आधारशी लिंक होऊन जाईल.

SMS पाठूवन करता येईल लिंकिंग

याशिवाय तुम्ही तुमच्या कोणत्याही मोबाइलवरून केवळ एसएमएस पाठवून पॅन आधारशी लिंक करू शकता. यासाठी मेसेजमध्ये UIDPAN टाइप करून 12 अंकी Aadhaar क्रमांक लिहा. आणि मग 10 अंकी पॅन क्रमांक टाका. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवून द्या.

निष्क्रिय पॅन कसे कराल सक्रिय?

निष्क्रिय झालेले PAN कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला केवळ एक SMS करावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपल्या रजिस्टर्ड मोबाइलमधून 12 अंकी PAN नंबर एंटर केल्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी Aadhaar क्रमांक एंटर करावा लागेल. यानंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 वर SMS करावा लागेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*