कोरोना लसीवरची राजकीय टिपण्णी भोवल्यानंतर अखिलेश यांची कोलांटउडी; आता म्हणतात, “लसीकरणाची तारीख लवकर घोषित करा”

वृत्तसंस्था

लखनौ : कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी, अशी सर्वजण प्रार्थना करत असताना, दुसरीकडे या लसीवरून राजकारणही सुरू झालेय. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लसीवरून एक अजब विधान केले होते की , “मी ही लस टोचवून घेत नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू?” मात्र यानंतर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलल्याचे दिसते आहे. akhilesh yadav U turns over covid 19 vaccine issue, says start early vaccinization

“करोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे भाजपा सरकारने याला कोणताही सजावटीचा-देखावा करणारा इव्हेंट समजू नये आणि अगोदरच सर्व व्यवस्था करून याची सुरूवात करावी. हा लोकांच्या जीवनाचा विषय आहे, शेवटी यामध्ये नंतर सुधारणांचा धोका नाही पत्कारता येत. गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असे अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे.कोरोना का टीकाकरण एक संवेदनशील प्रक्रिया है इसीलिए भाजपा सरकार इसे कोई सजावटी-दिखावटी इवेंट न समझे और अग्रिम पुख़्ता इंतज़ामों के बाद ही शुरू करे. ये लोगों के जीवन का विषय है अत: इसमें बाद में सुधार का ख़तरा नहीं उठाया जा सकता है.

“आम्हाला शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु भाजपाची टाळी-थाळीवाली अवैज्ञानिक विचारसरणी आणि भाजपा सरकारच्या लस देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही, जी कोरोनाकाळात ठप्प झाल्यासारखी आहे.” असे अखिलेश यादव यांनी ट्विट करून टीकाकारांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

हमें वैज्ञानिकों की दक्षता पर पूरा भरोसा है पर भाजपा की ताली-थाली वाली अवैज्ञानिक सोच व भाजपा सरकार की वैक्सीन लगवाने की उस चिकित्सा व्यवस्था पर भरोसा नहीं है, जो कोरोनाकाल में ठप्प-सी पड़ी रही है।

तर, “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असे अखिलेश यादव यांनी काल म्हटले होते.

akhilesh yadav U turns over covid 19 vaccine issue, says start early vaccinization

समाजवादी पार्टीचे मिर्झापूर येथील आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील आज(रविवार) करोना लसीबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिले गेले आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकते.” असे खळबळजनक विधान आशुतोष सिन्हा यांनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*