शहरांची नावे बदलून विकास होत नसतो; पण औरंगाबादच्या नामांतरावर ठाकरे – पवार – सोनिया सामोपचाराने तोडगा काढतील; अजितदादांनी करवून घेतली प्रश्नातून सुटका

विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरांची नावे बदलून विकास होत नसतो, असा औरंगाबादच्या नामांतरावरून उपमुख्यमंत्री अजितदादांनी शिवसेनेवर निशाणा साधला खरा, पण लगेच स्वतःला सावरून नामांतरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोनिया गांधी हे सामोपचाराने मार्ग काढतील, असे सांगून या प्रश्नातू आपली सुटका करवून घेतली. ajit pawar targets shivsena but evades question on renaming aurangabad

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावे यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत.

ajit pawar targets shivsena but evades question on renaming aurangabad

आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*