बंद दाराआड काय घडले, हे सांगायला मी ज्योतिषी नाही; अजितदादांनी टाळली अमित शहांच्या वक्तव्यावर सविस्तर प्रतिक्रिया


विशेष प्रतिनिधी

नागपूर : उद्धव ठाकरेंना बंद दाराआड कोणतेच वचन दिले नव्हते, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली, पण त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कशाला शिळ्या कढीला उत आणता, बंद दाराआड काय घडले, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, एवढीच प्रतिक्रिया व्यक्त करून सविस्तर बोलणे टाळले. ते पत्रकार परिषदेत लगेच पुढच्या प्रश्नाकड़े वळले.ajit pawar skips reaction over amit shah statement on uddhav thackeray

अजित पवार म्हणाले, की जेव्हापासून महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून सरकार पडण्याच्या तारखा सांगितल्या जात आहेत. मात्र, तसे काही घडलेले नाही. जोवर या सरकारला तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे हे सरकार अस्थिर होणार नाही.वाढीव वीजबिलांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले होते. गौतम अदानी पवारांना भेटले आणि वीजबिले कमी करण्याचा निर्णय फिरवला. काहीतरी लेनदेन झाली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना अनेक लोक भेटत राहतात. त्यामुळे अडानी त्यांना भेटले म्हणून काही घडले असे नाही, असे त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता वक्तव्य केले.

ajit pawar skips reaction over amit shah statement on uddhav thackeray

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती